Raju Shetti यांच्याकडून कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी, पूरग्रस्तांना काहीच मदत मिळत नसल्याचा आरोप

राजू शेट्टींकडून कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केलेली आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागात पाहणी केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राजू शेट्टींकडून कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केलेली आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागात पाहणी केली आहे. पूरग्रस्तांना काहीच मदत मिळत नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे. प्रशासनाकडून केवळ नोटीसा दिल्या जात असल्याचं राजू शेट्टी म्हणाले. पूरग्रस्तांना काहीही सोयी सुविधा मिळत नसल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.

शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे. जरी पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असला तरी यापूर्वी पडलेल्या पावसामुळे पाणी वाढत आहे. अजूनही पूरग्रस्त संभ्रमात आहेत. बारा तासात धरण क्षेत्रात पाऊस पडला तर अजूनही ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या परिसरात पिकांचे मोठे नुकसान जाले आहे. स्थलांतरणासाठी नागरिकांना मोठी अडचण निर्माण होते आहे. प्रशासनाकडून काहीच मदत नाही. प्रशासनाकडून नोटीसा दिल्या जातात बाकी काही नाही. पूरग्रस्तांना काहीही सोयी सुविधा मिळत नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com