Rajiv Kumar ON Maharashtra Assembly Election |26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवे सरकार?

26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवे सरकार येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत नव सरकार निर्माण होईल असं केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संकेत दिले आहेत.
Published by :
Team Lokshahi

26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवे सरकार येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत नव सरकार निर्माण होईल असं केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याची आयोगाकडून संकेत मिळत आहेत. निवडणूक आयोग किती टप्प्यामध्ये होईल हे लवकरचं सांगू असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली आहे. राज्य विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत संपते आहे. त्यापुर्वी निवडणूक होईल मात्र ही निवडणूक किती टप्प्यात होईल हे नंतर सांगू असं राजीव कुमार यांनी सांगितलेलं आहे.

त्यामुळे आता राज्यातील जनतेला आता उत्सुकता लागलेली आहे की कधीपासून आचारसंहिता लागू होणार, कधीपासून निवडणूकीचा हा कार्यक्रम जारी होणार आणि किती टप्प्यात ही निवडणूक होईल याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी आता निवडणूक आयोगाकडून सुरु असल्याचं पाहायला मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com