Rajendra Shingne : 'अजितदादांसोबत असलो तरी मनाने शरद पवारांसोबत'; राजेंद्र शिंगणेंना घरवापसीचे वेध

माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना घरवापसीचे वेध लागलेलं दिसत आहे. अजितदादांसोबत असलो तरी मनाने शरद पवारांसोबत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना घरवापसीचे वेध लागलेलं दिसत आहे. अजितदादांसोबत असलो तरी मनाने शरद पवारांसोबत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शरद पवार हेच आश्वासक नेतृत्व असल्याचं ही राजेंद्र शिंगणे म्हणाले. जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे अजित दादांसोबत गेलो असं देखील राजेंद्र शिंगणे म्हणाले. आता येत्या काळामध्ये राजेंद्र शिंगणे शरद पवारांसोबत जाणार तर नाही ना असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

यादरम्यान राजेंद्र शिंगणे म्हणाले, पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो. काही वेगळ्या विषयांवर त्याठिकाणी चर्चा झाली परंतु राजकीय विषयावर याठिकाणी अशी कोणती चर्चा झाली नाही असं राजेंद्र शिंगणे म्हणाले. त्याचसोबत पुढे ते म्हणाले, मी जरी अजित दादांच्या गटात असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून मी काही पवार साहेबांसोबत कोणते संबंध तोडले अशातला भाग नाही आज ही मी त्यांना नेता मानतो. मी याआधी ही पवार साहेबांच नाव भाषणामध्ये एक नेता म्हणून घेत आलोय आणि या पुढे ही ते आश्वासक नेतृत्व असतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com