Rahul Gandhi Nagpur Speech |संविधान केवळ पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

नागपुरातील सभेत राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल; संविधानावर अप्रत्यक्ष हल्ल्याचा आरोप
Published by :
shweta walge

आज नागपुरात संविधा सन्मा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. संविधानवर आरएसएस थेट हल्ला करु शकत नाहीत, म्हणून लपून वेगळ्या मार्गाने हल्ला केला जात आहे. असा गंभीरआरोप आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या सभेत ते बोलत होते.

तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचारातून संविधान निर्माण झालं आहे. भारत हा विविधतेने भरलेला देश असून अनेक जातीपातीचे लोकं एकत्र नांदतात हीच भारताची खरी ओळखं आहे. मात्र भारताच्या या एकात्मतेला एकत्र ठेवणाऱ्या संविधानाला काही अदृश्य शक्तींपासून धोका निर्माण झाला असल्याच ते म्हणाले.

आरएसएस समोरासमोर लढत नाही कारण, समोरासमोर त्यांचा कधीच निभाव लागणार नाही. जर लढले तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. त्यामुळे कायम लपून हल्ला करण्याचं काम सुरु आहे,असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com