Pune Woman Fraud : उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; अनेक महिलांना फसविल्याचा आरोप

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इनकम टॅक्स विभागातील जॉईंट कमिशनर पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकऱ्याने अनेक महिलांची फसवणूक करून शारीरिक शोषण केल्याचा दावा पुण्यातील एका महिलेने केला आहे.

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इनकम टॅक्स विभागातील जॉईंट कमिशनर (सह आयुक्त )पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणूक करून शारीरिक शोषण केल्याचा दावा पुण्यातील एका महिलेने केला आहे. आपलं पद, पैसा याचं प्रलोभण दाखवून सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

सुनिल आगवणे असं या अधिकाऱ्याचे नावं असल्याच या महिलेनं सांगितले आहे. आता पर्यंत त्याने तीन लग्न केली असून तिन्ही महिलांना मुलं असल्याचा दावा या पिडीत महिलेनं केला आहे. ही महिला पुणे पोलिसांकडे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हेलपाटे मारतं आहे. शेवटी तिने काल मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com