Pune Heavy Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, तसेच ग्रामीण भागातील खडकवासला , भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत.

पुढच्या 24 तासांतही मुसळधार पावसाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुणे हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशमन दल रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com