Pune Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीच्या पाण्यातून रसायनांचा फेस

लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीतील इंद्रायणी नदीला प्रदूषणाचं ग्रहण लागलं आहे.
Published by :
Team Lokshahi

लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीतील इंद्रायणी नदीला प्रदूषणाचं ग्रहण लागलं आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेसाचे थर निर्माण झाले आहेत. संपूर्ण इंद्रायणी नदी पात्र फेसानं भरुन गेलं आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून आळंदीमधील वारकऱ्यांनी अनेकदा आंदोलन, उपोषण केलं पण त्याचा कोणताही परिणाम प्रशासनावर झालेला दिसत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंद्रायणी प्रदूषणमुक्त करणार असल्याचं आश्वासन काही महिन्यांपूर्वी दिलं होतं. पण ही सर्व आश्वासनं हवेत विरल्याचं चित्र आहे. वारकरी इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करतात प्रदूषित इंद्रायणीमुळं लाखो वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com