व्हिडिओ
NCP Political Crisis : पार्थ पवार की सुनेत्रा पवार लढवणार निवडणूक?
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपदाची उद्या पोटनिवडणूक होत आहे.
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपदाची उद्या पोटनिवडणूक होत आहे. अजित पवारांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेच्या बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली असून पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवारांची राजकारणातील एंट्री किंवा पार्थ पवारांच्या राजकारणातील रिलॉन्चिंग या निमित्तानं होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घोषित केली होती. अजित पवार देतील तोच उमेदवार असणार आहे अशी बँकेच्या संचालक मंडळाची भूमिका आहे.