Pune Deccan Queen Birthday : पुणेकर प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झाली

1 जून 1930 रोजी ही रेल्वेगाडी पहिल्यांदा धावली होती
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई आणि पुणे प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेले ठरलेल्या डेक्कन क्वीनचा आज 93 वा वाढदिवस. 1 जून 1930 पुणे मुंबई पुणे या मार्गावर इलेक्ट्रिक हायस्पीड, कम्फर्ट, लक्झरी अशा सुविधांनी परिपूर्ण असलेली ही रेल्वे गेल्या 92 वर्षांपासून धावतेय. डेक्कन क्वीन ही जगातील एकमेव रेल्वे आहे जिचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. आजही सकाळी साडेसहा वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.. उपसभापती नीलम गोऱ्हे आणि रेल्वे प्रवासी संघाच्या हर्षा शहा यांच्या हस्ते केक कापून डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रेल्वेच्या इंजिनाचं पूजनही करण्यात आलं. अनेक वर्षांपासून या डेक्कन क्वीनमधून पुणे-मुंबई प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता, मात्र आता मोठ्या उत्साहामध्ये स्टेशन मास्तर, प्रवासी संघाच्या हर्षद शहा आणि याच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशानी एकत्र येऊन पुणे रेल्वे स्थानकावर कापून वाढदिवस साजरा केलाय. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com