Yavatmal : कनिष्ठ अभियंता मारहाणीचा निषेध, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा

कारवाई न केल्यास संपूर्ण जिल्हा अंधाऱ्यात ठेवण्याचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
Published by :
Team Lokshahi

यवतमाळच्या महागाव उपविभागाअंतर्गत येणाऱ्या काळी दौलत येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विद्युत अपघातात मृत्यू झाला. घटनेनंतर कनिष्ठ अभियंता निलेश काकडे यांना जमावतील दोघांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद दिल्यानंतर ही पोलिसांकडून आरोपी विरोधात कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी काम बंद आंदोलन करीत अधीक्षक अभियंतांच्या कार्यालयात काळीफती लावून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कारवाई न केल्यास संपूर्ण जिल्हा अंधाऱ्यात ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com