Vishalgad : विशाळगड परिसरात बंदी आदेश लागू; 19 जुलैपर्यंत राहणार बंदी

विशाळगड परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विशाळगड परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी हे आदेश जारी केले आहेत. आज सकाळपासून 19 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

विशाळगड अतिक्रमण मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. 17 जुलै सकाळी 6 वाजल्यापासून ते 19 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com