PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर; पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 29 हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पायाभरणी करतील.
Published by :
Dhanshree Shintre

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 29 हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पायाभरणी करतील. दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकल जाणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासह ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा प्रथमच मुंबई दौरा असणार आहे. पंतप्रधान सुमारे 5 हजार 600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा प्रारंभ करणार. तसेच मुंबईत इंडियन न्यूजपेपर्स सोसायटी टॉवर्सचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्ताराचे लोकार्पण होणार. नवी मुंबई इथल्या गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com