Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

नवरात्र उत्सवाला येत्या तीन तारखे पासून सुरुवात होत आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नवरात्र उत्सवाला येत्या तीन तारखे पासून सुरुवात होत आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सव काळात माहूर गडावर देशभरातून लाखो भाविक श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर संस्थानच्यावतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गडावर जाण्यासाठी बसची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानचे मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी यांनी दिली आहे. येथील कुलस्वामिनी, आदिमाया धनदाईदेवी मंदिराजवळ नवरात्रोत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आदिमाया धनदाईदेवीचे मंदिर 24 तास खुले असणार आहे. मंदिर परिसराची साफसफाई केली जात आहे. मंदिराजवळ नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा उत्सवानिमित्त भाविक दर्शनासाठी विशेष प्राधान्य देतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com