Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देणगीमूल्य दरामध्ये प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू दिला जातो. हरभरा डाळीचे पीठ, साखर, डबल रिफाईंड तेल,काजू, बेदाणा विलायचीचा वापर करून हा लाडू प्रसाद तयार केला जातो. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार हा प्रसाद तयार केला जातो. पंढरपूरला येणारा भाविक अत्यंत श्रद्धेने लाडूचा प्रसाद आपल्या गावाकडे घेऊन जातो. अशाप्रकारे लाडू प्रसाद बनवला जातो.
अन्न व औषध प्रशासन हा महाराष्ट्र राज्याचा एक महत्वाचा विभाग आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने केंद्र शासनाच्या औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम 2011 व त्यांतर्गत अधिनियमाची अंमलबजावणी करणेस जबाबदार आहेत. सदर कायद्याची अंमलबजावणी हि या कायद्यांतर्गत नेमणूक केलेल्या अधिकान्यांना प्राप्त अधिकार वापरून करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून संभाव्य गैरवर्तणूक तसेच भ्रष्टाचार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रशासनामध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या नियंत्रणाखाली दक्षता विभागाची स्थापना केली आहे.