व्हिडिओ
Shivrajeshwar Temple : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 500 रुपये भत्ता; राजकीय नेते म्हणाले...
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर मंदिर’ साठी राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला केवळ ५०० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे.
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर मंदिर’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला केवळ ५०० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीत वाढ करण्याचे आदेश देऊन दीड वर्षे झाले आहे. तरीदेखील त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शासकीय अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी ही मासिक निधी ५०० रुपयांवरून किमान २५ हजार रुपये करण्याचा आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.