Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप होणार आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत ही वाढ केली आहे. यासोबतच छगन भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेरही पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com