PM Modi On Congress: 'आदिवासींना जातीमध्ये तोडण्याचा प्रयत्न'मोदींची कॉंग्रेसवर जोरदार टीका

मोदींनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. या देशातील आदिवासींना जाती जातीमध्ये विभागून तुकडे करण्याचे प्रयत्न कॉंग्रेस करत आहे.
Published by :
Team Lokshahi

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील पहिली सभा झाली. त्यात ते बोलत होते. हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे, या नाऱ्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. सभेला नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. मोदी मंचावर येताच मोदी मोदी असा घोष झाला. मोदींनी हात उंचावून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले.

मोदी यावेळी म्हणाले की, काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम जीवित करून पाकिस्तानला अपेक्षित भूमिका घेत आहे. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे, ज्येष्ठ नेते आणि उमेदवार सुधीर मुनगंटीवार, चिमूरचे कीर्ती भांगडिया, किशोर जोरगेवार, कृष्णा सहारे, सुधीर पारवेकर, करण देवतळे हे उमेदवार उपस्थित होते.

तर यावेळी मोदींनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. या देशातील आदिवासींना जाती जातीमध्ये विभागून तुकडे करण्याचे प्रयत्न करत कॉंग्रेस आदिवासींना कमकुवात करत आहे, आदिवासीयांची एकता संपून ते एकमेकांमध्ये वाद निर्माण करतील हा कॉंग्रेसचा विचार आहे असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com