पावले चालती पंढरीची वाट...लावणी, अभंगांनी वारकऱ्यांचे मनोरंजन

पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकानी आपल्या कलेचे सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपलीही सेवा विठल चरणी दिली.
Published by :
Team Lokshahi

विनोद गायकवाड| यवत

जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अंबिका सास्कृतिक कला केंद्राच्या लावणी कलावंतांनी आपल्या अदाकारीत भजन, भक्तीगींतांसह मराठी सिनेसृष्टीतील गाण्यावर नृत्य सादर केलेय... पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकानी आपल्या कलेचे सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपलीही सेवा विठल चरणी पोहचविण्याचा सायास केलाय... जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय ...लावणी कलावंतांशी संवाद साधलाय आमचे दौंडचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com