व्हिडिओ
Pandharpur Dhangar Protest | धनगर आरक्षणाचा सहावा दिवस, आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता
पंढरपूरात धनगर समाजाचे उपोषण सुरु असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. तर आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
पंढरपूरात धनगर समाजाचे उपोषण सुरु असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. तर आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. उपोषणकर्त्यांना शंभूराज देसाई, चंद्रकांत पाहील भेटणार आहेत, त्यामुळे आजच्या या चर्चेतून कशाप्रकारचा तोडगा निघतो हे पाहण देखील तितकचं महत्त्वाचं आहे.
यापार्श्वभूमीवर शंभूराज देसाई म्हणाले, धनगर समाजाचे प्रतिनिधी पंढरपूर या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यांची भेट घेऊन सरकारच्या वतीनं आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्यासोबत फोनवर बोलले आहेत त्यांनी त्यांना सांगितले आहेत. आमचं मंत्री मंडळ आणि शिष्टमंडळ पाठवलेलं आहे. त्यामुळे तातडीने त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही 3 मंत्री आता पंढरपूरकडे जात आहोत. सरकार त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यावर निश्चतपणे निर्णय घेईल.