एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्या संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कॅडर एकत्र आले होते. आंदोलना दरम्यान, शुक्रवारी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांकडून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना 23 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.
व्हिडिओ बाबत तपास सुरु
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, हा व्हिडिओ पुण्याच्या नावाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासण्यात येत आहे. हा व्हिडीओ कुठचा आणि कोणी व्हायरल केला? व्हिडिओमधील आवाज एडिट केले आहेत की नाही, याचाही तपास सुरू आहे.