Mahadev Betting App Case Update : महादेव बेटिंग अ‍ॅपच्या मालकाला दुबईतून अटक

महादेव बेटिंग अ‍ॅपचे सह-संस्थापक रवी उप्पलला अटक करण्यात आली आहे. दुबईतून रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

महादेव बेटिंग अ‍ॅपचे सह-संस्थापक रवी उप्पलला अटक करण्यात आली आहे. दुबईतून रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर रवी उप्पलला अटक करण्यात आली आहे. भारतीय एजन्सी यूएईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्याला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पललाअटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com