Pune : पुण्यात भाजपच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा

भाजपच्या काल पुण्यात झालेल्या राष्ट्रीय बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपची काल पुण्यात बैठक पार पडली.
Published by :
Team Lokshahi

भाजपच्या काल पुण्यात झालेल्या राष्ट्रीय बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपची काल पुण्यात बैठक पार पडली. रामजन्मभूमी सोहळा, सुपर वॉरियर्स यासह विविध उपक्रमांच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी एल संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com