Dombivali Metro : मेट्रो कारशेडच्या सर्व्हेक्षणाला विरोध ; विरोध डावलून सर्व्हेक्षणाला सुरुवात
डोंबिवलीत मेट्रो कारशेडच्या सर्व्हेक्षणाला विरोध करण्यात येत आहे. कल्याण-तळोजा मेट्रो-12ची सोनारपाड्यात कारशेड उभारण्याच्या दृष्टीने स्थानिकांनी आता विरोध केला आहे. स्थानिकांचा विरोध डावलून सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे. सोनारपाडा, उंबार्ली, माणगावात मेट्रोची कारशेड उभारण्याच्या दृष्टीने आता मागणी करण्यात येत आहे.
कल्याण तळोजा 12 या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा ही मेट्रो रेल्वेच्या कामाकरीता राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. त्याठिकाणी जागा सर्वेक्षणाकरीता एमएमआरडीएचे सर्व्हेअर कल्याण तहसीलदार गेले असता, शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला. पण सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घालत कारवाई चुकीची आहे, गावकऱ्यांना भूसंपादनाच्या वेळी विचारात घेतले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.