Online Gaming scam : अनंत जैनचे दुबई कनेक्शन उघड; बनावट ऑनलाइन गेमिंगप्रकरणी 58 कोटींची फसवणूक

नागपूरच्या व्यापारी ऑनलाइन गेममध्ये 58 कोटी फसवणूक झाल्यानंतर व्यापारी आक्रमक
Published by :
Team Lokshahi

नागपूर: ऑनलाइन जुगाराच्या आहारी जाऊन अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. पण आता यावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लिमिटेड ने केली आहे. गेल्या काही महिन्यापासून ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांचा संसार कोलमडला आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे. अशा स्थितीत लोकांना आयुष्यातून उठवणाऱ्या ऑनलाइन जुगारावर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लिमिटेड ने केली आहे. जर पूर्णतः बंदी लादणे शक्य नसेल तर ते सुरू ठेवताना योग्य ती काळजी घेऊन, त्याबाबतचे स्पष्ट धोरण नियंत्रित करायला हवे.

ज्याप्रमाणेआंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान या राज्यांनी ऑनलाइन जुगार बंदी आणली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राने ऑनलाईन जुगारावर स्पष्ट भूमिका घेत धोरण जाहीर करायला हवे. तसेच ऑनलाईन जुगाराला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्री मध्ये शेड्युल क्राईम ठरवण्यात यावे. याकडे एनसीसीएलचे माजी अध्यक्ष कैलास जोगानि यांनी लक्ष वेधले आहे. या नागपूरच्या ज्या व्यापाऱ्याने 58 करोड जुगारामध्ये हरले ते आमच्याच व्यापाऱ्यांचे देणे लागत होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.या सगळ्या खेळांना सरकारचा आश्रय आहे, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com