Guru Purnima : गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर 24 तास खुलं राहणार, शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी

साईबाबांच्या गुरु पौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाला देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः साईबाबांच्या गुरु पौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाला देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहे. देशभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे.

साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. तर तिकडे स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई संस्थांच्या वतीने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com