व्हिडिओ
Beed: बीडमध्ये कुणबी नोंदीची संख्या 20 हजारांवर, जिल्हाधिकाऱ्यांकडून आयुक्तांना अहवाल सादर
बीड जिल्ह्यात कुणबी नोंदीची संख्या वीस हजारावर पोचली आहे. महिनाभरात तब्बल सहा हजार नव्या नोंदी सापडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.
बीड जिल्ह्यात कुणबी नोंदीची संख्या वीस हजारावर पोचली आहे. महिनाभरात तब्बल सहा हजार नव्या नोंदी सापडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. न्यायमुर्ती शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दस्तवेज, अभिलेखांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. मागील महिन्याभरात जिल्ह्यात सुमारे सहा हजार नव्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कुणबी नोंदीची संख्या आता सुमारे वीस हजारांवर पोहोचली आहे. या नोंदी आढळल्याने मराठा समाजाने समाधान व्यक्त केलं आहे.