व्हिडिओ
NASA : चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून
वॉशिंग्टन अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे.
वॉशिंग्टन अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ल्यूनार टेरेन व्हेईकल (एलटीव्ही )असे या कारला नाव देण्यात आले आहे.
अमेरिकेने आता पुन्हा चंद्रमोहीम हाती घेतली असून, त्यासाठी उपकरणांची नासाकडून निर्मिती केली जाणार आहे. अमेरिका अंतराळवीरांना चंद्रावर पाठविणार आहे. त्यांना चंद्रावर सहजपणे भ्रमंती करता यावी यासाठी नासा एलटीव्ही तयार करणार आहे.