Nitesh Rane On Rahul Gandhi: आरक्षणविरोधी वक्तव्यावरून नितेश राणेंचा राहुल गांधीना टोला

Nitesh Rane On Rahul Gandhi: आरक्षणविरोधी वक्तव्यावरून नितेश राणेंचा राहुल गांधीना टोला

राहुल गांधीविरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन सुरु आहे. आरक्षणविरोधी वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राहुल गांधीविरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन सुरु आहे. आरक्षणविरोधी वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजपकडून टकाँग्रेस हटाओ आरक्षण बचावटचा नारा देण्यात आलेला आहे. राहुल गांधींनी अमेरिकेमधल्या इंटरव्ह्यूमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्याचं निषेधमधून भाजपकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सत्तेधारी नेते आंदोलन करताना दिसतायेत. राहुल गांधी यांच्याविरोधामध्ये ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

देशाच्या संसदेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा पक्ष यांचा विरोधी जी भूमिका आहे, जो खरा चेहरा आहे तो राहुल गांधीच्या मुखातून बाहेर आलेली आहे. या देशामध्ये काँग्रसचा विचार आता ज्या दिवशी आलं त्या दिवशी आरक्षण आणि उलटी गिनती सुरु होईल. याची जाणीव देशाच्या जनतेनी घ्यावी आतापर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या एनडीएच्या सरकारवर फेक नरेटीव्हच्या नावाने खोटं पसरवण्याचं काम केलं लोकसभेमध्ये आदरणीय पंतप्रधानांची प्रतिमा खराब केली. पण आज मी जबाबदारीने आणि विश्वासाने सांगतो की ज्या देशामध्ये जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीएचं सरकार आहे तोपर्यंत या देशाचा आरक्षणाचा ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही, कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही.

जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत आरक्षण आहे ज्यादिवशी काँग्रेसच्या हातात सत्तेच्या चाव्या गेल्या मग कुठल्याही राज्याच्या असो की देशाच्या त्यादिवशी असलेलं आरक्षण संपवून टाकण्याचा काम काँग्रेसच्या विचाराचं सरकार करेल हे त्यांचेच नेते राहुल गांधीनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संजय राजाराम राऊत यांनी मोठं आरक्षणाच्या बाबतीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं. अमेरिकेमध्ये बसलेले राहुल गांधी यांनी जे जे बोललेले आहेत ते पूर्ण इन्टरव्हि्यू लोकांनी पाहिलेली आहे असे नितेश राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com