व्हिडिओ
गरबा खेळणाऱ्यांचे आधारकार्ड पाहूनच त्यांना आत प्रवेश द्या; नितेश राणेंचे आवाहन
भाजपा गटाचे आमदार नितेश राणे यांनी गरबा आयोजकांना आवाहन
भाजपा गटाचे आमदार नितेश राणे यांनी गरबा आयोजकांना आवाहन केले आहे. गरबा खेळायला येणाऱ्या लोकांचे आधारकार्ड पाहूनच त्यांना आत प्रवेश द्यावा, असे राणेंनी सांगितले. याच काळात लव्ह जिहादचे प्रकार होतात ते होऊ नये म्हणून आधारकार्ड पाहून जर व्यक्ती हिंदू असेल, तरच त्यांना आत प्रवेश द्यावा. जर इतर धर्मातील लोकांना गरबा खेळायचाच असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, असे त्यांनी सांगितले.