'NDA' लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार

लोकसभा निवडणुकीनंतर आता 24 जून म्हणजेच कालपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीनंतर आता 24 जून म्हणजेच कालपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या नियुक्तीवरुन बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. एमडीए लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे.

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे निवडणूक घेणार आहेत. इंडिया आघाडीच्या वतीने लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यात येणार आहे. तर आजच्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com