Supreme Court: राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 23 जुलैला होणार सुनावणी
राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 23 जुलैला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी आहे. तर सर्वोच्च न्यायालयात 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली होती आपापल्या राज्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा निर्णय नेमका काय असेल या विषयी लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि काही आमदार हे शिंदेंसोबत गेलेले होते. त्यानंतर शिवसेना हे नाव जरी शिंदेंना मिळालं असलं तरी देखील तो वाद अजूनही सुरुच आहे. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं होतं त्याला आता वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ज्या याचिका दाखल आहेत आमदार अपात्रता प्रकरणाच्या त्या प्रकरणामध्ये उद्या सुनावणी होणार आहे.