NCP : जनसन्मान यात्रेची नवाब मलिकांकडून तयारी; सना मलिक यांच्याकडून ट्विटरवर व्हिडीओ अपलोड

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची नवाब मलिक यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे. सना मलिक यांच्याकडून याबद्दलचा व्हिडीओ देखील ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची नवाब मलिक यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे. सना मलिक यांच्याकडून याबद्दलचा व्हिडीओ देखील ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये आहे, तसेच चेंबूरमध्ये अजित पवारांची सभा पार पडणार आहे.

त्याचसोबत मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभेतही यात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र अद्याप ते कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत ही भूमिका उघड केलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com