Nanded : नांदेडमध्ये राज्यस्तरीय मुस्लीम मेळावा होणार

मराठा ओबीसी आणि धनगरच्या मेळाव्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नांदेडमध्ये राज्यस्तरीय सर्वपक्षीय मुस्लिम महामेळावा होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठा ओबीसी आणि धनगरच्या मेळाव्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नांदेडमध्ये राज्यस्तरीय सर्वपक्षीय मुस्लिम महामेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात मुस्लिम समाजाची बैठक झाली आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, संरक्षण आणि आरक्षण यांसारख्या विविध मुद्दांवर चर्चा केली होती. 'फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला दिशा देण्यात येईल', अशी माहिती महाराष्ट्र राज्य विकास मंडळाचे माजी सदस्य जाकेर चाऊस यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com