Narayan Rane On MVA: मविआ फक्त टाईमपास करतेय ; राणेंचा घणाघात
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 161 उमेदवार निवडणून येतील आणि सरकार देखील महायुतीचं येईल असा विश्वास देखील भाजपचे नेते नारायण राणे यांनी दाखवलेला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हिच खरी शिवसेना असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. लोक शिंदेंच्या शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत.
कारण त्यांना भाजप सारखा चांगला मित्र आहे. मविआ पराभूत होणार आहे हे त्यांना माहित आहे आणि त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नसल्याचं आरोप नारायण राणेंनी केला आहे. महाविकास आघाडीचा केवळ टाईमपास होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
यादरम्यान नारायण राणे म्हणाले की, महायुतीचा एक सर्व्हे समोर आला आहे. महायुतीचे एकूण 161 उमेदवार निवडणून येणार आहेत आणि सरकार पण येणार. मविआमध्ये सगळेच चेहरे मुख्यमंत्री पदासाठी समोर आले आहेत कारण त्यांचा चेहराच ठरलेला नाही आहे. आमची महायुती ओरिजनल आहे आणि त्यांची डमी आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी आहे कारण त्यांना सज्जन माणसांचा पक्ष मित्र म्हणून मिळाला आहे.