व्हिडिओ
Nanded: नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमध्ये सुरु होते उपचार
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्या निधानाने नांदेडकरांवर शोककळा पसरली आहे.
याचपार्श्वभूमीवर अजित पवार व्यक्त होत म्हाणाले, हरहुंदरी अशाप्रकारचं व्यक्तीमत्त्व होत. अतिशय साधा आणि मन मिळावु अशाप्रकारचा वसंत चव्हाण यांचा स्वभाव होता. जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करतं असलो तरी देखील मनामध्ये कोणत्याही प्रकारची कटूता न ठेवता ते संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतं होते. परंतू अशा घटना घडत असतात आणि शेवटी त्यागोष्टीला सामोरे जावं लागतं. मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.