व्हिडिओ
CM मला तुमच्याशी बोलायचंय : राज्यभरातल्या महापालिकेत चाललंय तरी काय? कंत्राटात अशी मिळते टक्केवारी
मुंबई महापालिका कामाची कंत्राटे देत असताना नगरसेवकांपासून ते चपराशापर्यंत प्रत्येकाचं कमिशन आणि टक्केवारी ठरलेली असल्याचं एका कंत्राटदारानं लोकशाही न्यूजला सांगितलंय. धक्कादायक बाब म्हणजे कंत्राटं देत असताना मारवाड्यांना प्राधान्य देऊन मराठी माणसाला जाणीवपूर्वक टाळलं जातं.. यामागचं कारण म्हणजे मराठी माणूस कमिशन देताना सहजासहजी तयार होत नाही असं या कंत्राटदारानं सांगितलं..खरं तर कमिशन देऊन तो कंत्राटदार काय काम करणार यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. लोकशाहीशी बोलताना मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं कि हे फक्त एकट्या मुंबईत नाही तर सगळीकडे चालत.