व्हिडिओ
J. J. Hospital : मुंबईच्या जे जे रुग्णालयातही येणार यंत्रमानव; यंत्रमानव करणार मोठमोठी ऑपरेशन्स
वैद्यकीय विश्वात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.
वैद्यकीय विश्वात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. सध्या रोबोटिक शस्त्रक्रिया ही आधुनिक पद्धती फक्त खासगी रुग्णालयात आहे. मात्र या शस्त्रक्रियांचा खर्च अफाट असतो. तो गरिबांना परवडत नाही.
मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने आता या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात म्हणून जे जे रुग्णालयातसुद्धा यंत्रमानव आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३२ कोटी २२ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील रोबोट खरेदी करणारे 'जे जे' हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरणार आहे.