व्हिडिओ
Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18.73 टक्के वाढ झालेली आहे. मागील दोन दिवसात जवळपास 8 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झालेल्याची माहिती मिळाली आहे.
पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18.73 टक्के वाढ झालेली आहे. मागील दोन दिवसात जवळपास 8 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झालेल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट होते, 10 टक्के पाणी कपात आधीच केली जात होती.
तर रिजर्व पाणीसाठ्यातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच तुलसी आणि बिहार धरण क्षेत्रात मागील 24 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता, आणि त्यादरम्यान या क्षेत्रात देखील पाणीसाठा वाढला आहे.