Mumbai Goa Highway Traffic : सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. वडखळ ते कासू, कोलाड आणि लोणेरे येथे देखील प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई-गोवा महामार्गावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. वडखळ ते कासू, कोलाड आणि लोणेरे येथे देखील प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. हजारो वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले असून चाकरमानी देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. दरम्यान वाहतूक पोलिसांकडून देखील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

असंख्य एस टी बस आणि तसेच खाजगी वाहने देखील या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. अनेक गणेशभक्त हे गावी जाण्यासाठी निघाले आहेत. रायगड जिल्ह्यात पाहायचं झालं तर वडखळ, कासू त्याचबरोबर कोलाड आणि त्यानंतर माणगाव, लोणेरे याठिकाणी जवळपास 6 ते 7 किलोमीटरवर तसेच काही ठिकाणी 8 ते 10 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी 2 ते 4 तास वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com