Mumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाची चाळण, खड्डे कधी बुजवणार?

रस्त्यावरील खड्ड्यावरून टीका होत असताना रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा
Published by :
Team Lokshahi

रायगड: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज शनिवार (दि. 05 ऑगस्ट) पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली. रस्त्यावरील खड्ड्यावरून टीका होत असताना मंत्री रवींद्र चव्हाण पाहणी दौरा करत आहेत. कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते पनवेल असा पाहणी दौरा रवींद्र चव्हाण करत आहेत.

यावेळी चव्हाण म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाच्या आधाराने रस्ता तयार केला जात आहे. गणपती आधी एक लेन रस्ता केला जाणार असून यासाठी सीटीबी तंत्रज्ञानचा वापर केला जात आहे. गणपती पर्यंत चाकरमण्याना सुखकर प्रवास मिळणार, मी सुद्धा कोकणातला आहे त्यामुळे हा रस्ता व्हावा हि माझी इच्छा आहे असे वक्तव्य चव्हाणांनी यावेळी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com