व्हिडिओ
Mumbai: राज्यातील 506 रेल्वे प्रकल्पांचा आज शुभारंभ
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉल्सचे उद्घाटन, नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉल्सचे उद्घाटन, नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने सोहळ्यांना उपस्थित लावली. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हा कार्यक्रम झाला असून कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री सहभागी होते.
यामध्ये ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ स्टॉल्सचे उद्घाटन/समर्पण, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सोलर पॅनल, ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम, गति शक्ती कार्गो टर्मिनल्स, गुड्स शेड्स, लोको शेड्स/वर्कशॉप्स, नवीन लाईन्स/लाइन्सचे दुहेरीकरण/गेज कन्व्हर्जन, जनऔषधी केंद्र, रेल्वे कोच रेस्टॉरंट्स आणि वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ यांचा समावेश होता.