खासदार सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवारांची भेट?; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुण्यातील मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवार दाखल झाल्या होत्या.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातील मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवार दाखल झाल्या होत्या. काल छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आज सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली. यावर आता चर्चा सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ म्हणाले की, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. ते कौटुंबिक सख्य आहे. एवढी वर्ष एकत्रित राहिलेलं आहे. मन मोठं करुन जावं लागते. पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. पवार कुटुंबातील सर्वात जेष्ठ सदस्य आहेत. त्यांना भेटणं म्हणजे फार चांगली गोष्ट त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com