Raj Thackeray : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात यंदा चार दसरा मेळावे होणार असून यात एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि एक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे.

यासोबतच आज दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे पॉडकास्टिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही दसरा मेळाव्याआधी राज ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करणार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील तोफ धडाडणार आहे. त्यामुळे या पॉडकास्टमधून राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com