मनसे कार्यकर्त्यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला असताना सुप्रीम कोर्टानं दिलेला अल्टिमेटम संपूनही मुंबईतील कलिना येथील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेल वर मराठी भाषेतील नामफलक नाही. याच मुद्द्यावरून मनसे ग्रँड हयात हॉटेल समोर आक्रमक झाली पण आंदोलन कारण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे आंदोलकांना ताब्यात घेतलं. वाकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे.