Microsoft | मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत 520 कोटींची गुंतवणूक

मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत 520 कोटींची गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत 520 कोटींची गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टचा 520 कोटींचा व्यवहार केलेला आहे. मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. याआधी मायक्रोसॉफ्टने डेटा सेंटर उभारणीसाठी दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन खरेदी केली होती.

अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये आपली गुंतवणूक वाढवत आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडी येथे जमिन खरेदी केलीय. या डीलमधून सरकारच्या खात्यात 31 कोटींहून अधिक रक्कम जमा झालीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com