Beed : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी फोडली एसटी बस, आंदोलनाला लागले हिंसक वळण

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीडच्या चव्हाटाच्या फाट्यावर मराठा आंदोलकांनी एसटीची बस फोडली.
Published by :
Team Lokshahi

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीडच्या चव्हाटाच्या फाट्यावर मराठा आंदोलकांनी एसटीची बस फोडली. त्यानंतर आंदोलक घटनास्थळावरुन निघून गेले. मराठा आरक्षणासाठी शांततेनं आंदोलन करा. हिंसा करु नका असं आवाहन वारंवार मनोज जरांगे करत आहेत. मात्र तरिही बीडमध्ये आंदोलकांनी एसटी बसची तोडफोड केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com