Jalna : मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काऊंटडाऊन सुरु!

जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा पार पडला.
Published by :
Team Lokshahi

जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा पार पडला. मराठ्यांनो गाफील राहू नका. षडयंत्र ओळखा असं आवाहन मनोज जरांगे यांनी या मेळाव्यात मराठा बांधवांना केलं आहे. हे आवाहन करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप केला आहे. या तिघांनी छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना मराठ्यांना उकसवायला लावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

यावेळी जरांगेंनी राज्य सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून 22 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जरांगेंनी थेट फडणवीसांना समज देण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच अजित पवारांकडेही भुजबळांना समज देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

विराट अशी सभा अंतरवाली सराटी येथे 100 एकर शेतीवर झाली. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारला दिलेल्या मुदतीतील 10 दिवस शिल्लक असून 10 दिवसांत सरसकट आरक्षण देण्याचं अल्टिमेटम जरांगेंनी सरकारला दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com