Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली

विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आली आहे यामुळे राज्यभरात जोरदार तयारी सुरु होताना दिसून येत आहे.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आली आहे यामुळे राज्यभरात जोरदार तयारी सुरु होताना दिसून येत आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आजपासून आंतरवालीत इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 20 ऑक्टोबरला आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक होणार आहे.

या बैठकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे. अशातच मनोज जरांगे पाटील मुस्लीम, दलीत आणि मराठा एकत्रित करून सत्ता परिवर्तन करण्याच्या वक्तव्यामुळे अधिक चर्चेत आले आहेत. यामुळे मुस्लीम नेते सोबत जाण्यास तयार होतात की नाही याकडे लक्ष लागलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com