मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा, म्हणाले, "मी जेलमध्ये सुद्धा...."

फडणवीसांचा जरांगे यांनी एकेरी उल्लेख न करता त्यांना आदराने आवाहन केल्याचं समोर आलंय.
Published by :
Team Lokshahi

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जरांगे यांनी उपोषणादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परंतु, आता जरांगे पाटील यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख न करता त्यांना आदराने आवाहन केल्याचं समोर आलंय. जरांगे यांनी अंतरवाली सराटीत लावलेल्या संचारबंदीबाबत भाष्य केलं आहे. "फडणवीस साहेब नाराजी अंगावर घेऊ नका , मी जेलमध्ये सुद्धा उपोषण करेन. अंतरवाली सराटीत संचारबंदी लावण्याचं कारण काय, त्या रिक्त जागा आचारसंहितेपूर्वी भरा, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, मराठी समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं, ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं, अशा विविध मागण्यांवर जरांगे ठाम आहेत.

Manoj Jarange Statement On Devendra Fadanvis
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

राज्य सरकराने मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची घोषणा केल्यानंतरही जरांगे ओबीसींच्या प्रवर्गातून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. जरांगे यांनी नुकतच आमरण उपोषण मागे घेतलं. परंतु, तमाम मराठा आंदोलक आरक्षणासाठी साखळी उपोषण करतील, मराठा समाज त्यांच्या मागण्यांवर ठाम असेल, असं ते उपोषण मागे घेताना म्हणाले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय असणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com