Sanjay Raut on Manohar Joshi : मनोहर जोशींचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी, संजय राऊतांची प्रतिक्रिया

संजय राऊत म्हणाले कि, एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर आहे. हजारो शिवसैनिक त्यांच्यासाठी आदर्श होते. आज त्यांची दुपारी 3 वाजता अंतयात्रा निघेल आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ.
Published by :
Dhanshree Shintre

संजय राऊत म्हणाले कि, एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर आहे. हजारो शिवसैनिक त्यांच्यासाठी आदर्श होते. आज त्यांची दुपारी 3 वाजता अंतयात्रा निघेल आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा एक ब्राम्हण मुख्यमंत्री केलं म्हणून टीका झाली. महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधी कोणाची जात पाहिली नाही त्याचं कर्तृत्ववान आणि कर्तबगारी पाहिली आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडलं आणि बाळासाहेब ठाकऱ्यांची स्वप्न होती विकासासंदर्भात ती त्यांच्या कार्यातून पूर्ण केली.

आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. सामनाचे ते खूप निष्ठावंत वाचक होते सामना वाचून नेहमी फोन करायचे किंवा जीवनामध्ये महत्त्व असं आहे कि ज्येष्ठ सहकारी होते, ज्येष्ठ नेते होते. अनेकदा आम्ही एकत्र वावरलो, फिरलो, दौरे केले त्यांच्याकडून शिकन्यासारख्या अनेक गोष्टी होत्या आणि त्यातला एक म्हणजे वक्तशीरपणा. वेळेचं बंधन त्यांनी स्वत:वर घातलं होतं आणि वेळ पाळायचे आणि राजकारणामध्ये वेळ पाळावी हे त्यांच्याकडून शिकावं.

त्यांच्या कार्याकाळातील अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे जे बाळासाहेबांनी करुन घेतलं ते म्हणजे विस्तापित कश्मीरी पंडीत त्यांच्या मुलांना महाराष्ट्र राज्यामध्ये इंजिनिअरींगपासून अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा कश्मीरी पंडीतांसाठी जर या देशामध्ये कुठे राखीव जागा तर ते महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या झाल्या आणि ते बाळासाहेब ठाकऱ्यांचं स्वप्न होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com